घरफोडीत चोरट्यांनी केला चार लाखांचा ऐवज गायब

प्रल्हाद कांबळे
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

- भरदुपारी लोणी (ता. देगलूर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि नगदी असा चार लाखाचा ऐवज लंपास केला.

- अज्ञात चोरट्यांविरूध्द मरखेल पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नांदेड : भरदुपारी लोणी (ता. देगलूर) येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दहा तोळे सोन्याचे दागिने आणि नगदी असा चार लाखाचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. ही घरफोडी मंगळवारी (ता. २०) दुपारी दोनच्या सुमारास घडली. 

लोणी येथील बाबाराव शिंदे हे आपल्या घरला कुलूप लावून परिवारासह शेतावर कामासाठी गेले होते. तर काही महिला बाहेरगावी गेल्याने घरी कोणीच नव्हते. दुपारी बारा ते दनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरी कोणीच नसल्याची संधी साधून खुर्चीने कुलूप तोडले. घरात प्रवेश करून कपाटातील ११४. २० ग्राम वजनाचे व नगदी ४८ हजार असा एकूण तीन लाख ९० हजाराचा ऐवज लंपास केला.

बाबाराव शिंदे हे परत अडीचच्या सुमारास घरी परत आल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आले. त्यांनी लगेच मरखेल पोलिसांना घरफोडीची माहिती दिली. मरखेल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत गुंंगेवाड यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठले. पंचनामा करून बाबाराव शिंदे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोलिस उपनिरीक्षक दिनेश येवले हे करीत आहेत. दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft of four lakhs at Loni in Nanded