जालन्यातील जांबसमर्थ येथील श्री राम मंदिरातील मुर्त्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jambsamarth shri ram mandir temple

समर्थ रामदास स्वामींची जन्मभूमी असलेल्या जांबसमर्थ (जि. जालना) येथे हि घटना आज सकाळी उघडकीस आली.

जालन्यातील जांबसमर्थ येथील श्री राम मंदिरातील मुर्त्यांची चोरी

जांबसमर्थ (जि. जालना) - समर्थ रामदास स्वामींची जन्मभूमी असलेल्या जांबसमर्थ (जि. जालना) येथील समर्थ रामदास स्वामींच्या पुर्वजांचे देवघर समजल्या जाणाऱ्या जुन्या ऐतिहासिक मंदीरातील सातशे ते साडेसातशे वर्षाच्या श्री राम, सीता, लक्ष्मण, मारोतीच्या मुर्ती, श्री राम पंचायतन यासह समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागताना भिक्षा पात्रात वापरत असणारी मुर्ती, दंडावर बांधत असणारी मुर्ती, काही पंचधातुंच्या मुर्ती अज्ञान चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून जवळच्या खोलीत ठेवलेल्या मंदिराच्या कुलपाच्या चाव्या घेवून मंदिर उघडुन पुन्हा बंद करून चाव्या जागेवर ठेवून देत मंदिरातील सर्वच मुर्ती चोरून नेवून पोबारा केला.

सोमवारी (ता. 22)पहाटे मंदिराचे पुजारी धनंजय देशपांडे नित्याप्रमाणे मंदिर उघडत असताना हा प्रकार त्यांच्या लक्षात आला त्यांनी तत्काळ गावकऱ्यांना माहिती दिली व घनसावंगी पोलिस ठाणे गाठले व पोलिसांना माहिती दिली.जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे, अप्पर पोलिस अधीक्षक विक्रांत देशमुख,उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मरळ यांच्यासह विविध पथकांनी गावाला भेट दिली असुन पोलिस तपास सुरू आहे.या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र पोलिस आणि पोलिसांच्या गाड्यांची वर्दळ सुरू आहे.

दरम्यान विधानसभेत माजी मंत्री राजेश टोपे यांनी लक्षवेधी मांडुन या चोरीचा तपास लावण्याची मागणी केली.

दरम्यान ग्रहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आपण संपर्कात असून या चोरीचा लवकर छडा लावल्या जाईल असे सांगितले.

Web Title: Theft Idols Shri Ram Temple At Jambsmarth Village In Jalna Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..