Pachod Police : पैठण तालुक्यातील आडूळमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह साडेसात लाखांचा ऐवज लंपास

ही घटना घडल्याने आडूळसह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Pachod Police
Pachod Policeesakal
Summary

आडूळ येथील ही पंधरा दिवसातील तिसरी चोरी घटना असून पंधरा दिवसांपूर्वी मारुती मंदिरातील पुजारी महिलेची जास्त दक्षिणा देतो अशी थाप मारुन त्यांच्या गळ्यातील पोत लंपास केली होती.

आडूळ : आडूळ (ता. पैठण) येथे गेल्या पंधरा दिवसांपासून चोरीचे सत्र सुरु असून काल (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी आडूळसह तांडा येथे घराची कुलूपं व कडी कोयंडा तोडून कपाटातील सोन्या-चांदींच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. दरम्यान, आज घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ञाला पाचारण करण्यात आले होते.

पाचोड पोलिसांनी (Pachod Police) दिलेल्या माहितीनुसार, आडूळ तांडा (ता. पैठण) येथील शेतकरी विजय अंबरसिंग राठोड हे स्वतः च्या मालकीच्या घरात कुटुंबीयांसह राहतात. काल विजय राठोड व त्यांच्या पत्नी जेवण करून रात्री झोपी गेले. शनिवारी मध्यरात्री तीन ते चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अंगणातील लाईटचे वायर तोडून अंधाराचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी घरातील बॅगेतील चावी काढून कपाटातील कपडे आणि इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकून त्यातील रोख रक्कम ३२ हजार व दोन नेकलेस, गंठन, झुंबर, अंगठी, १०० मान्याची पोत, एकदानी, तीन बाळ्या, नथ असे दहा तोळ्याचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७५२००० (सात लाख बावन्न हजार) रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.

विजय राठोड यांचा लहान भाऊ संदीप राठोड हा शनिवारी सकाळी झोपेतून उठला, तेव्हा त्याला घडलेला प्रकार नजरेस पडला. त्याने लगेच घरातील इतर सदस्यांना झोपेतून उठविले व तत्काळ या घटनेची माहिती मोबाईलद्वारे पोलीस पाटील सुनील चव्हाण व पाचोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे यांना कळविली.

Pachod Police
महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर रत्नागिरीत वाळू माफियांचा हल्ला; कराटे चॅम्पियन असलेल्या महिलेचा किक मारत धाडसाने प्रतिकार

यानंतर घटनास्थळी पाचोड पोलीस दाखल झाले. घटनास्थळी श्वान पथकासह ठसे तज्ञालाही पाचारण करण्यात आले होते. पैठणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे, भगवान धांडे, सहायक पोलीस निरिक्षक शरदचंद्र रोडगे, पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर राडकर यांनी पाहणी केली. या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फौसदार जगन्नाथ उबाळे करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत आडूळ येथील शेख अब्बास शेख नूर यांची गावालागतच शेती असून ते संपूर्ण कुटुंबासह तेथेच राहतात. शनिवारी ते कुटुंबासह घरात झोपलेले असतांना चोरट्यांनी अगोदर त्यांच्या घरा समोरील लाईट बंद केले व यानंतर लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व भिंतीवर लटकवलेल्या पर्स, शर्ट व कपाटाची झाडाझडती करुन त्यातील रोख रक्कम २० हजार घेऊन पसार झाले.

Pachod Police
Paschim Railway : पश्चिम रेल्वेवर फुकटे वाढले! दोन महिन्यात तब्बल 38 कोटी 3 लाखांचा दंड वसूल

आडूळ येथील ही पंधरा दिवसातील तिसरी चोरी घटना असून पंधरा दिवसांपूर्वी मारुती मंदिरातील पुजारी महिलेची जास्त दक्षिणा देतो अशी थाप मारुन त्यांच्या गळ्यातील पोत लंपास केली होती, तर आठ दिवसांपूर्वी येथील बायपास रोडवर दुचाकीस्वार पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील मनीमंगळसूत्र हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. या दोन्ही चोऱ्यांचा तपास अद्यापपर्यंत लागला नसतांना शनिवारी परत ही घटना घडल्याने आडूळसह परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com