
श्री गुळगुळे यांनी नकार देताच त्यांच्या हातातील बॅगमधील दोन लाख रुपये घेऊन विना नंबरच्या गाडीवरुन पळ काढला. सदरील घटना ही मुख्य बाजारपेठेत घडल्यांने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुरुंदा (हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोमवारी (ता.११) भर दिवसा चार वाजता व्यापाऱ्याला लुटून बॅगमधील दोन लाख रुपये लुटून पसार झाले आहे. सदरील घटना गावातील मुख्य बाजारपेठेत घडल्यांने व्यापाऱ्यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
वसमत तालुक्यात कुरुंदा येथे सोमवारी मुख्य बाजारपेठेत असलेले राजकुमार किराणा स्टोअर्सचे मालक प्रल्हादराव गुळगुळे हे तीन लाख पंचाहत्तर हजार रुपये बँकेत भरण्यासाठी जात असताना मोटार सायकलवर आलेल्या ईसमांनी त्यांना हटकले व आम्ही लाचलुचपत विभागाचे आहोत आपल्या बॅगमध्ये चरस आहे. ती बॅग आम्हाला उघडण्यासाठी द्या असे म्हणाले. श्री गुळगुळे यांनी नकार देताच त्यांच्या हातातील बॅगमधील दोन लाख रुपये घेऊन विना नंबरच्या गाडीवरुन पळ काढला. सदरील घटना ही मुख्य बाजारपेठेत घडल्यांने व्यापाऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
या चोरट्यांनी गावातील अन्य एका सराफ दुकानात चोरीच्या हेतुने चौकशी केली असल्याचे व्यापाऱ्यानी सांगितले. सदरील घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक श्री. हाश्मी, गुन्हे आन्वेशन विभागाचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, कुरुंदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. गोपिनवार यांनी पाहणी करुन माहिती घेतली. सीसीटीव्हीच्या फुटेजद्वारे या चोरट्यांचा तपास लावला जात आहे. सदरील घटनेसंबधी उशीरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.