नांदेड : जिल्ह्यातील 24 पीएसआय झाले एपीआय

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे राजेश प्रधान यांनी राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्न्तीवर झालेल्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी (ता. ३०) जारी केला.

नांदेड : राज्याच्या पोलिस महासंचालक कार्यालयातील आस्थापना विभागाचे राजेश प्रधान यांनी राज्यातील १५५८ पोलिस उपनिरीक्षकांच्या पदोन्न्तीवर झालेल्या बदल्यांचा आदेश शुक्रवारी (ता. ३०) जारी केला. या बदल्यात नांदेड जिल्ह्यातील २४ फौजदार पदोन्न्तीवर म्हणजेच सहाय्यक पोलिस निरीक्षक झाले आहेत. यात शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे नंदकिशोर सोळंके यांना सोलापूर शहर तर विमानतळ सुरक्षेच्या सारिका करंडे यांना मुंबई शहर देण्यात आले आहे. 

राज्यात सध्या विधानसभेचे वारे वाहत असल्याने त्यापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या हा निवडणूक आयोगाचा एक प्रकार आहे. तसेच मागील अनेक वर्षापासून फौजदारांच्या पदोन्नती हा विषय रखडला होता. शेवटी पोळ्याचा मुहूर्त लागला. राज्यातील एक हजार ५५८ फौजदारांना सहाय्यक पोलिस निरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.

पदोन्नती झालेले फौजदार व नियुक्तीचे ठिकाण कंसात

गजानन मोरे, आनंद बनसोडे, संगमनाथ परगेकर, संतोष सानप, संतोष शेकडे, दूर्गा बारसे, प्रविण सोमवंशी ( नांदेड परिक्षेत्र), शारदा भोपाळे (नागपूर शहर), अल्ताफ मुलानी (मुंबई शहर), माधूरी मुंडे (लोहमार्ग औरंगाबाद), राजेंद्र वाघमोडे (नागपूर परिक्षेत्र), रामदास निरदोडे ( रा. गु. वी.), मनिषा तायडे ( अमरावती परिक्षेत्र), समाधान कवडे, ज्ञानेश्‍वर कांबळे, सोमनाथ कवडे (औरंगाबाद परिक्षेत्र), शिशीरकुमार देशमुख ( नाशिक परिक्षेत्र), संतोष गंगापूरकर ( मुंबई शहर),  सुनिल अवसरमोर (कोकण परिक्षेत्र), विनयक लंबे (अमरावती परिक्षेत्र), उमेश कदम (नाहसं, मुंबई), माधवी मस्के ( गुअवी, पूणे), रत्नदीप गायकवाड (पुणे शहर) यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are 24 PSI beomes API in Nanded