Vidhan Sabha 2019 : परभणीत प्रभावी उमेदवारांची माघार नाहीच!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

परभणी : जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवारांनी माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. कारण आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. तर जिल्ह्यात एकूण ८१ पैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार 
रिंगणात आहेत.
 

परभणी : जिल्‍ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली एकाही उमेदवारांनी माघार घेतली नसल्याने जिल्ह्यात बहूरंगी लढती रंगणार आहेत. कारण आघाडी व युतीच्या बंडखोरांची मनधरणी होऊ शकली नाही. तर जिल्ह्यात एकूण ८१ पैकी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून ५३ उमेदवार 
रिंगणात आहेत.
 
प्रामुख्याने गंगाखेड मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाली असून शिवसेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही. त्यामुळे सेनेचे विशाल कदम, रासपचे डॉ. रत्नाकर गुट्टे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. मधुसूदन केंद्रे, माजी आमदार सिताराम घनदाट, सेनेचे माजी विधानसभा प्रमुख संतोष मुरकुटे यांच्या लढत रंगणार आहे. येथे १५ उमेदवार रिंगणात आहेत. दुसरीकडे परभणीतून १२ उमेदवारांनी माघार घेतली असून १५ जण रिंगणात आहेत. परंतु काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने अधिकृत उमेदवार रविराज देशमुख यांना अवघड जाणार आहे. त्यांच्यासह शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील, एमआयएमचे अली खान, वंचित बहूजन आघाडीचे मोहमंद गौस यांच्या प्रमुख लढत होतील.

तसेच जिंतूरमध्ये देखील शिवसेनेचे जिल्हा परिषद गटप्रमुख राम खराबे पाटील यांनी अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपच्या मेघना बोर्डीकर, राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे, वंचितचे मनोहर वाकळे यांच्यात लढत पाहवाय मिळेल. येथे १३ उमेदवार मैदानात आहेत. पाथरी मतदारसंघात सर्वात कमी दहा उमेदवार रिंगणात असून येथे भाजपचे आमदार मोहन फड, काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यासह एमआयएम आणि वंचित आघाडीत फाईट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: there is no any withdrawal from effective candidate in Parbhani