

Unknown thieves stole seven goats from a welding workshop in Thergaon, Paithan taluka, after breaking the lock late at night. Two young kids were left behind, creating an emotional scene as the owner's child fed them milk from a bottle. Police have launched an investigation.
Sakal
पाचोड : पैठण तालुक्यातील थेरगाव येथे अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरासमोर असलेल्या वेल्डिंग वर्कशॉपमध्ये बांधलेल्या सात बकऱ्या चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. चार) रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.