धनंजय शेटेभूम : भूम येथील जय मोबाईल शॉपी मध्ये मागील आठवड्यात दि .19 रोजी पहाटेच्या दरम्यान चोरी झाली होती .या चोरीचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने लावण्यात आला व मुद्देमालासह चोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे ..वेताळ रोड भुम येथील जय म्युझीकल अॅण्ड मोबाईल शॉपी नावाचे मोबाईलचे दुकानाचे शटरचा कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 18 नोव्हेबर रोजी 09.00 ते दि. 19. नोव्हेबर रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन दुकानातील वेगवेगळ्या कंपनीचे टेक्नो एच.एम.डी. विवो, सॅमसंग झेड फोल्ड 6, वन प्लस 10 आर, रेडमी कंपनीचे एआर बडस, रेडमी कंपनीचे स्मार्ट वॉच असे एकुण 6,89,866₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मोहन बागडे यांनी दि. 19 नोव्हेबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे गुरनं 259/2024 कलम 331 (4), 305 (अ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे..गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मा. पोलीस अधीक्षक. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली कौशल्यपुर्ण तपास करुन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने कांही मोबाईल फोनचे लोकेशन धाराशिव, भुम, मोहा, ढोकी, माळकरंजा असे वेगवेगळ्या ठिकाणी येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून शोध घेतला. मोबाईल सिम चा धरक यास त्याच्या ताब्यात असलेल्या मोबाईल फोन बाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की, मागील चार दिवसापुर्वी भिमा काळे रा. सांजा रोड धाराशिव याच्याकडून पावती नंतर देतो अशा अटीवर 5,000₹. ला विकत घेतला आहे असे सांगीतले..Milk Production : दूध उत्पादकांना मिळाली गुड न्यूज; ऑक्टोबरपर्यंतचे दूध अनुदान देण्यास सुरुवात : आयुक्त प्रशांत मोहोड.त्यानंतर संशईत सिम 9356364319 चे लोकेशन भुम येथे येत असल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून तेथे एक महिला मिळून आली. तिस तिच्या ताब्यात असलेल्या मोबाईल बाबत विचारपुस केली असता तिने सांगितले की माझा मुलगा राजु अर्जुन काळे याने आणुन घरी ठेवला आहे. असे सांगितल्याने राजा अर्जुन काळे याचा शोध घेतला असता तो गोलेगाव ता. भुम येथे मिळून आला. त्यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्याने सांगितले की, मी व माझा साथीदार सुभाष श्रीरंग चव्हाण रा. ढोकी ता. जि. धाराशिव असे आम्ही दोघांनी मिळून भुम येथील मोबाईल शॉपी दुकानाचे शटर तोडून दुकानातील बरेच मोबाईल चोरी केले आहेत. .असे सागिंतल्यावरुन पथकाने ढोकी येथे जावून सुभाष श्रीरंग चव्हाण यास ताब्यात घेवून नमुद गुन्ह्या संबंधाने विचारपुस केली असता राजा काळे याने सांगीतले प्रमाणे हकीकत सांगुन सदर गुन्हा मी व राजा अर्जुन काळे असे आम्ही दोघांनी केल्याचे कबुल केले. त्यावर पथकाने त्या दोघांनी काढून दिलेले मोबाईल हस्तगत केले.] नमूद चोरीतील 25 मोबाईल फोन असा एकुण 5,35,206 ₹ किंमतीचा माल हस्तगत करुन पुढील कारवाईस्तव नमूद दोघांना चोरीच्या मोबाईल फोनसह भुम पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.