Beed Theft: मनोज जरांगेंच्या सभेत गर्दीचा फायदा घेत चोरट्यांची मोठी हातसफाई; सहा लाखांहून अधिक ऐवज लंपास
Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या मांजरसुंबा येथील सभेत गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सोन्याच्या साखळ्या व रोख रक्कम चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
बीड : अंतिम इशारा बैठकीला झालेल्या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी रविवारी (ता. २४) चांगलीच हातसफाई केली. रोख रक्कम, सोनसाखळी असा सहा लाख ३० हजारांचा ऐवज मांजरसुंबा येथून लंपास झाला. याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.