पोलिस कर्मचाऱ्यास लुटले; रोख रक्कमेसह दागिन्याची चोरी

file photo
file photo
Summary

या प्रकरणी प्रदीप कांबळे यांच्या तक्रारीवरून चार अनोळखी चोरांविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत.

केज (बीड): नाशिकहून वडीलांच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी कुटूंबासह लातूरकडे निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्याची (police officer) कार अडवून चोरांनी लोखंडी गज व काठीचा धाक दाखवून‌ रोख एक्केवीस हजार रुपयासह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण त्र्यान्नव हजार चारशे रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना मांजरसुंबा-केज रस्त्यावरील सावंतवाडी फाट्याच्या जवळ शुक्रवार (ता.१४) रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अनोळखी चार चोरांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे. (Thieves stole cash and some jewelery from a police officer)

file photo
Coronavirus| बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनावरील औषधांचा तुटवडा

लातूर जिल्ह्यातील सलगरा (बुद्रुक) येथील प्रदीप अशोक कांबळे (वय-३६) हे नाशिक पोलीस दलात सेवेत आहेत. ते त्यांचे कुटुंब घेऊन स्वीफ्ट कारने (एमएच-०२ईएच-१०६८) नाशिकहून लातूरकडे निघाले होते. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्यांची कार मांजरसुंबा-केज रस्त्यावरील सावंतवाडी फाट्याजवळ आली असता चार चोर अचानक कारसमोर आले. त्यामुळे कारचे ब्रेक दाबल्याने वाहनाचा वेग कमी होताच चोरांनी कारची चावी काढून घेत लोखंडी गज व काठीचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख एक्केवीस हजार रूपयांसह अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने‌ असा ऐकून त्र्यान्नव हजार चारशे रुपयांचा ऐवज लुटून घेऊन चोरांनी घटनास्थळावरून अंधारात पलायन केले.

file photo
बीड जिल्ह्यात कोरोनाचा वेग दुप्पटीने वाढला,एका दिवसातील पॉझिटिव्हचा रेट २५ टक्के

या प्रकरणी प्रदीप कांबळे यांच्या तक्रारीवरून चार अनोळखी चोरांविरोधात केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे पुढील तपास करीत आहेत. अशा प्रकारच्या वाटमारीच्या घटना केज शहराच्या परिसरात अनेकवेळा घडल्या आहेत. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यास लूटणाऱ्या लूटारूंचा शोध घेणे पोलिस प्रशासनासमोर आवाहन उभे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com