चक्क उभ्या पेट्रोल टँकरचे नऊ टायर नटबोल्ट खोलून पळवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसमत (जि.हिंगोली) : बोराळा येथे उभ्या पेट्रोल टँकरचे नऊ टायर नटबोल्ट खोलून चोरट्यांनी पळवले.

चक्क उभ्या पेट्रोल टँकरचे नऊ टायर नटबोल्ट खोलून पळवले

वसमत (जि.हिंगोली) : तालुक्यातील (Vasmat) बोराळा परिसरातील शारदा पेट्रोल पंपावर (Petrol Pump) उभा असलेल्या टँकरचे स्टेपणीसह नऊ टायर नटबोल्ट खोलून चोरट्यांनी पळविल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी (ता.११) सकाळी ३ ते ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सदरील नऊ टायरची किंमत एक लाख ३५ हजार रुपये आहे. तालुक्यातील बोराळा शिवारातील (Crime In Hingoli) गट क्रमांक ७१ मधील वसमत-औंढा राज्यमार्गावरील शारदा पेट्रोलपंपावर टाटा कंपनीचे पेट्रोलचे टँकर (एमएच ३८ एएक्स २२७०) उभे होते. या उभ्या असलेल्या पेट्रोल टँकरचे बुधवारी चोरट्यांनी जॅक चढवून मागील आठ टायर व एक स्टेपनी टायर असे एकूण ९ टायर नटबोल्ट खोलुन पळविले. या नऊ टायरची किंमत १ लाख ३५ हजार रुपये आहे.

हेही वाचा: 'जनआशीर्वादा'तून भाजप करणार शक्तिप्रदर्शन, बीडला वगळले!

या प्रकरणी अभिषेक जयचंद्र तत्तापुरे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या मार्गदर्शनाखालील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.पी शिंदे हे करित आहेत.

टॅग्स :Hingoli