पाचोड - अज्ञात चोरट्यांनी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचोड, ता. पैठण येथील एका हॉटेलमधील देशी - विदेशी दारूचा साठा व किराणा साहित्य चोरून नेल्याची घटना गुरुवारी (ता. १५) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली..यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड परिसरात दिवसेंदिवस वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येत असतानाच, मध्यरात्री चोरट्यांनी हॉटेलमध्ये मद्यसाठा लांबवून पोलिसांना आव्हानच दिले. येथे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर जय भवानी हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी केलेल्या या घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे..येथील प्रतीक अंबादास नरवडे यांचे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत जय भवानी बिअर बार आहे. गुरुवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करत हॉटेलमधील दारूचा साठा तसेच किराणा माल चोरून नेत धुडगूस घातला. या घटनेची माहिती हॉटेल चालकाला समजताच त्यांनी पाचोड पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व पोलीस कर्मचारी संदीप जाधव यांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाची पाहणी केली..मात्र चोरट्यांनी नेमका किती रुपयांचा माल लंपास केला, याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. घडलेल्या या घटनेमुळे पाचोड परिसरातील व्यापाऱ्यांत धास्तीचे वातावरण पसरले असून या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला. पोलिस सभोवतालचे सर्व सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य उपलब्ध संशयास्पद पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा काढत आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.