

देगलूरमध्ये भीषण अपघात: तेलंगणा बसने स्कुटीला उडविले; निवृत्त एसटी वाहकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू, महामार्गावर गतिरोधकाची मागणी जोरात
Sakal
देगलूर : अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील देगलूरच्या महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टजवळ स्कुटी व तेलंगणा बसच्या झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मारुती कोळनुरे किरकोळ जखमी झाले.