यंदाही रमजान ईद साध्या पद्धतीने साजरी होणार; लॉकडाउनचा फटका

सध्या सर्वत्र प्रशासनाच्या वतीने संचारबंदी जाहीर होऊन जवळपास एक महिन्याच्या वर उलट आलेला आहे. यामध्ये महत्त्वाचा सीजन असलेल्या या दोन महिन्यात अनेक व्यापारी लग्नसराईचा व धार्मिक सण
मशिद रमजान महिना
मशिद रमजान महिना

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : सध्या कोरोना आजाराने (Corona virus) थैमान घातले आहे. त्याला अनेक जण बळी पडत असल्याने याहीवर्षी अनेक सण उत्सव साध्या पद्धतीने ( simple festival) साजरे होत असून त्यातच मुस्लिम समाजाचा पवित्र महिना असलेला रमजान ईद (ramjan eid) ही यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार आहे. This year too, Ramadan Eid will be celebrated in a simple manner; Lockdown blow

सध्या सर्वत्र प्रशासनाच्या वतीने संचारबंदी जाहीर होऊन जवळपास एक महिन्याच्या वर उलट आलेला आहे. यामध्ये महत्त्वाचा सीजन असलेल्या या दोन महिन्यात अनेक व्यापारी लग्नसराईचा व धार्मिक सण असल्याने मोठा व्यापार करतात परंतु गेल्या वर्षापासून आलेल्या कोरोना आजाराने थैमान घालत अनेकांचे बळी घेतले आहे. तसेच दिवसेंदिवस आजाराचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने कडक लॉकडाउन जाहीर केले आहे. यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने पूर्णपणे बंद आहेत. दुकाने बंद असल्याने अनेक व्यापाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत.

हेही वाचा - ‘डाएट’चे अधिव्याख्याते, कर्मचारी सावकारांच्या दारात; अनियमित वेतनामुळे आर्थिक संकट

ज्यामध्ये कपडा व्यापारी सराफा व्यापारी कटलेरी व्यापारी तसेच सलूनवाले, बँड पथकवाले, आचारी, मजुरी करणारे यांचे मागील वर्षापासून मोठी नुकसान होत आहे. तसेच सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र व महत्त्वाचा असलेला रमजान महिना सुरु असल्याने अनेक मुस्लिम बांधव उपवास करतात व पाच वेळची नमाज तसेच दररोज रात्री पवित्र कुरानचे पठण असलेली तराबी नमाज अदा करतात या महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपवास करत खाण्यापिण्यावर मोठा पैसा खर्च करतात व महिनाअखेरीस कुटुंबीयांसह कपडा व इतर साहित्याची खरेदी करतात व इतर घेवान देवांन बरोबर जकात दानधर्म करतात.

परंतु याही वर्षी मुस्लिम बांधवांना व भगिनींना जुन्याच कपड्यावर ईद साजरी करावी लागणार असल्याने रमजान ईद साध्या पद्धतीने व घरीच नमाज पडून घरच्या घरी कोणाच्या भेटीगाठी न घेता साध्या पद्धतीने साजरी करावी लागणार आहे. गरजू व्यक्तींना मुस्लिम बांधव काही गाजावाजा न करता गुपचूप दान करीत आहे. गेल्या वर्षीपासून अनेक मुस्लीम कारागीर छोटे व्यापारी रमजान ईदच्या सिझनवर कमी भाडवल कमी वेळात नफा कमावतात परंतु गेल्या वर्षीपासून लागलेल्या लोकडाऊनमुळे अशा अनेक व्यापार्‍यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com