सेलूतून साईबाबा जन्मभूमीकडे हाजारो भाविक मार्गस्थ

file photo
file photo

सेलू (जि.परभणी) : पाथरी हीच श्री साईबाबांची जन्मभूमी म्हणून पाथरीकरांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (ता. नऊ) सकाळी सेलू येथील साईबाबांच्या सदगुरूंची श्री.केशवराज महाराजांची महाआरती करून सेलू ते पाथरी पायी महादिंडीला प्रारंभ झाला. पायी दिंडीत दहा हाजारांवर भाविकांनी उर्स्फूत सहभाग नोंदविला.

साईबाबाचे सदगुरु श्री केशवराज बाबासाहेब महाराज मंदीरातून पायी महादिंडीस प्रारंभ करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्त्यावरुन दिंडी मार्गस्थ झाली. दिंडीच्या स्वागतासाठी शहरात विविध ठिकाणी सुंदर रांगोळी काढून पायी महादिंडीचे स्वागत करण्यात आले. दिंडीत शहरासह ग्रामिण भागातील जवळपास दहा हजारांच्यावर भक्तगण व महिला भक्तगणाचा सहभाग होता. दिंडीमध्ये एम्ब्यूलंस डॉक्टर व सेवापथक,व सर्व सोय करण्यात आली होती. दिंडीत सर्वात समोर साई व सदगुरु यांचा रथ, साई जन्मभूमी पाथरी व सदगुरुस्थान सेलूच्या २९ पुराव्याचा चित्ररुप देखावा, दहा घोडे, दीडशे तोफांची सलामी, टाळ मृदूंग, भजन, कीर्तन, ध्वज पताका, नाश्तापाणी, शरबत आदी सुविधा करण्यात आल्या होत्या.

कुंडी पाटीवर स्वागत
दिंडीचे कुंडी पाटीवर नाष्टा पाणी देवून स्वागत झाले. त्यानंतर गुगळी धामणगाव येथे ग्रामस्थांनी चहापाणी देवून स्वागत झाले. दिंडी सिमुर गव्हाण येथील  नरेंद्रचार्य पिठात पोहोचल्यानंतर येथे नरेंद्रचार्य पिठाकडून दिंडीला जेवण देवून त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाले. व किर्तन होवून दिंडी पाथरीकडे मार्गस्थ झाली.

साईबाबांची जन्मभूमी पाथरीच 
साईबाबांच्या जन्मभूमीचा शिर्डीकरांनी विरोध केला. त्यानंतर साईबांबाची जन्मभूमी असलेल्या पाथरीकरांनी श्रध्दा व सबुरीने आंदोलन सुरू केले. साईबांबाचे सदगुरू असलेले सेलू येथील श्री. केशवराज बाबासाहेब मंदिराची कमिटी व सेलूकरांनी पाथरीकरांना पाठिंबा देण्याच्या हेतूने रविवारी (ता.९) सेलू ते पाथरी, अशी पायी दिंडीचे आयोजन केले. या दिंडीत सेलू शहरासह तालुक्यातील साईभक्तांनी उर्स्फूत सहभाग नोंदवून साईबाबांची जन्मभूमी पाथरीच अल्याची भावनाच व्यक्त केली असल्याचे स्पष्ट झाल्याचे दिसत होते.

आमदार मेघना बोर्डीकर पायी दिंडीत
साईबाबांची जन्मभुमी पाथरीच व साईबाबांचे सदगुरू सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज हेच आहेत. हे त्रिकाल सत्य असून शिर्डीकरांनी उगाच विरोध करू नये यासाठी सेलू-पाथरी मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर या पायी दिंडीत स्वत:तब्बल २६ किलो मिटर अंतर पायी चालत आहेत. त्यांच्या सोबत सेलूचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष विनोद बोराडे हे देखील पायी चालत असून पाथरिकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com