नांदेडमध्ये अडकलेले हजारो शिख भाविक पंजाबकडे रवाना

प्रल्हाद कांबळे
Monday, 27 April 2020

पंजाब सराकर व महाराष्ट्र सरकारने यात तोडगा काढत अखेर अडकून पडलेले सर्व भाविक तिन टप्प्यात पंजाबकडे रवाना झाले. सोमवारी (ता. २७) सायंकाळी उर्वरीत भाविक पंजाबहून आलेल्या विशेष लक्झरी वाहनांमधून जाणार असल्याचे संत बाबा बलविंदरसिंग यांनी सांगितले. 

नांदेड : सचखंड गुरुद्वाराचे दर्शन व हल्लामोहल्ला या पवित्र कार्यक्रमासाठी पंजाब व परिसरातील राज्यातून आलेले शिख भाविक मागील एक महिण्यापासून नांदेडमध्ये अडकून पडले होते. पंजाब सराकर व महाराष्ट्र सरकारने यात तोडगा काढत अखेर अडकून पडलेले सर्व भाविक तिन टप्प्यात पंजाबकडे रवाना झाले. सोमवारी (ता. २७) सायंकाळी उर्वरीत भाविक पंजाबहून आलेल्या विशेष लक्झरी वाहनांमधून जाणार असल्याचे संत बाबा बलविंदरसिंग यांनी सांगितले. 
 
नांदेड येथील संचखंड गुरुव्दारा येथे दर्शनासाठी आलेल्या पंजाब, हरीयाणा व दिल्ली येथील भाविकांना लॉकडाऊनमुळे अडकून पडावे लागले होते. यात्रेकरूंना घेऊन जाण्यासाठी पंजाब सरकारने खास व्यवस्था केली असून ८० ट्रॅव्हल्स नांदेडमध्ये सोमवार (ता. २७) सकाळी नांदेड येथे दाखल झाल्या आहेत. जवळपास अडीच हजार यात्रेकरू नांदेड येथून पंजाबकडे सायंकाळी रवाना होणार आहेत.

हेही वाचाब्रेंकिंग ः हिंगोलीत पुन्हा चार एसआरपीएफचे जवान पॉझीटीव्ह

जवळपास तीन ते साडे तीन हजार यात्रेकरू

कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीवर निर्बंघ घालण्यात आले आहत. त्यामुळे जवळपास तीन ते साडे तीन हजार यात्रेकरू नांदेड येथील गुरुव्दारा येथे दीड महिन्यांपासून अडकून पडले होते. या यात्रेकरूंना पंजाब येथे जाता यावे, यासाठी महाराष्ट्र व पंजाब सरकारने समन्वय साधत या यात्रेकरूंना गावी जाण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे मागच्या दोन दिवसांमध्ये २५ ट्रॅव्हल्समध्ये ९०० यात्रेकरू पंजाबच्या दिशेने जाऊ शकले.

सर्व गाड्यांवर दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी

उर्वरीत सर्व यात्रेकरूंना त्यांच्या मुळ गावी घेऊन जाता यावे, यासाठी पंजाब सरकारने खास ८० वातानुकुलीत गाड्यांची व्यवस्था केली आहे. या सर्व गाड्या नांदेड येथे सोमवारी सकाळी दाखल झाल्या आहेत. प्रत्येकी एका गाडीसोबत तीन ड्रायव्हर असून सर्व गाड्यांवर दोन उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी पंजाब सरकारने सोबत दिले आहेत. संतबाबा नरेंद्रसिंघजी व संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्या कृपाशिर्वादाने नांदेडमध्ये अडकून पडलेल्या यात्रेकंरूसाठी जाण्याची व्यवस्था झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of devotees stranded in Nanded leave for Punjab