esakal | मासेमारी कंत्राटदाराला शिवीगाळ, धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

चित्र

फुलंब्री येथील तलावाचा मासेमारीचा ठेका घेतलेल्या सुषमेश राजू प्रधान (वय 24) यांना मासेमारी करणाऱ्या नऊ जणांनी जातिवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

मासेमारी कंत्राटदाराला शिवीगाळ, धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री, ता. 25 (जि.औरंगाबाद) : फुलंब्री येथील तलावाचा मासेमारीचा ठेका घेतलेल्या सुषमेश राजू प्रधान (वय 24) यांना मासेमारी करणाऱ्या नऊ जणांनी जातिवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली.

यावरून फुलंब्री पोलिस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कौतिक बनसोडे, गणेश बनसोडे, सदाशिव बनसोडे, उत्तम लांडगे, जगन बनसोडे, प्रभाकर बनसोडे, संतोष बनसोडे, संजय बनसोडे, विजय बनसोडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


सुषमेश प्रधान यांची महात्मा फुले मागासवर्गीय मस्त्स्य व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित फुलंब्री आहे. संस्थेचा मासेमारीचा ठेका फिर्यादीचे वडील राजू प्रधान यांच्या नावे आहे. फिर्यादी तलावावर पाहणी करण्यासाठी गेला असता तेथे आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मासेमारीच्या उद्देशाने उभे होते. त्यांना विचारणा केली असता ते सर्वजण फिर्यादीच्या अंगावर धावून आले व जातिवाचक शिवीगाळ करून फिर्यादीला अपमानित केले. तुला मारून टाकू म्हणून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

loading image
go to top