Ausa News : शाळेत घुसून शिक्षकांना निलंबनाची धमकी; अभिजीत दिपकेसह पाच जणांवर औसा पोलिसात गुन्हा दाखल

औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत अनधिकृत प्रवेश करून शासकीय कामात अडथळा.
Abhijit Dipke

Abhijit Dipke

esakal

Updated on: 

औसा - औसा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत अनधिकृत प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके, अजिंक्य शिंदे यांच्यासह चार ते पाच अनोळखी व्यक्तींविरुद्ध औसा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांना ‘तुम्हाला निलंबितच करायला लावतो’, अशी धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादी शिक्षिका शमशादबानो सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com