साडेतीन किलो ‘हा’ अमली पदार्थ जप्त 

file photo
file photo

नांदेड : नांदेडमध्ये येणारा अवैध गांजा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी जप्त केला. ही कारवाई मंगळवार (ता. १७) पहाटे दोनच्या सुमारास आसना बायपास पुलाजवळ केली. या प्रकरणी एकाला अटक केली. 

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आसना बायपास जवळ रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक गस्तीवर होते. त्यांना मिळालेल्या माहितीवरुन अर्धापूरकडून नांदेडकडे गांजा घेऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी त्यांनी त्या ठिकाणी सापळा लावून मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास एक दुचाकी (एमएच४०-एई-६४४४) वरून देवसिंग महासिंग बस्सी (वय ४९० रा. जेवली ता. उमरखेड (जिल्हा यवतमाळ) हा आला.

तिन किलो ५२३ ग्राम गांजा

पोलिसांनी त्याची दुचाकी थांबविली. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीची तपासणी केली असता आत २७ हजार ७०७ रुपयाचा तिन किलो ५२३ ग्राम गांजा मिळून आला. गांजा व २५ हजाराची दुचाकी असा ५६ हजार ७०७ रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून आरोरपीला अटक केली. विमानतळ पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुध्द फिर्याद देऊन विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात अमलीपदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक संजय ननवरे करीत आहेत. 


विज चोरांविरुध्द गुन्हा दाखल
 
नांदेड : विजपुरवठा करणाऱ्या तारांवरून आकोडा टाकून विज चोरी करणाऱ्या ११ जणांवरिरुध्द भारतीय विद्युत अधिनियमानुसार भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ही विज चोरी हळदा (ता. भोकर) येथे होत होती. 

महावितरणच्या भोकर उपविभागात विज चोरीच्या घटना वाढत असल्याने वरिष्ठ कार्यालयाकडे अनेक तक्रारी जात होत्या. त्यावरून वरिष्ठ कार्यालय भोकर कार्यालयाला जाब विचारत असल्याने येथील उपकार्यकारी अभियंता शेख अब्दुला हसजीद जिलानीयांनी आपल्या पथकासोहत विज चोरीला आळा बसावा म्हणून एक पथक स्थानपन केले. हे पथक हळदा (ता. भोकर) येते गेले. यावेळी अनेकांच्या घरात जाणारी विज ही आकोडे टाकून घेतल्याचे आढळून आले.

एक लाख २२ हजार ८६० रुपयाची सात हजार ६०१ युनीट विज चोरी

या पथकानी कारवाई करत तब्बल ११ जणांचे आकोडे जप्त केले. त्यांनी जवळपास एक लाख २२ हजार ८६० रुपयाची सात हजार ६०१ युनीट विज चोरी केल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी शेख अब्दुला यांच्या फिर्यादीवरुन भोकर पोलिस ठाण्यात भारतीय विद्यूत अधिनियम- २००३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. लेखुळे करीत आहेत. 

हे आहेत विजचोर : 

परमेश्‍वर तुकाराम बोईनवाड, विठ्ठल गणपती आरलेवाड, प्रकाश रामा आरलेवाड, गणेश रानपूर भोसले, केरबा सयाजी टिकेकर, धोंडिबा गायकवाड, संभाजी टिकेकर, राम होणाजी गायकवाड, पाशामिया खाजामिया शेख, पार्वतीबाई संभाजी टिकेकर, नन्हुसाब खाजामिया शेख सर्व राहणार हळदा (ता. भोकर)


  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com