
कुरुंदा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पांगरा शिंदे शिवारात मंगळवार (ता. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास अवैध दारुसह तीन लाख ४२ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुरुंदा (ता. वसमत, जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा पोलिस स्थानकाच्या हद्दीतील पांगरा शिंदे शिवारात मंगळवार (ता. १२) रात्री साडेदहाच्या सुमारास अवैध दारुसह तीन लाख ४२ हजार ४३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुरुंदा पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या पांगरा शिंदे येथे अवैध दारुची वाहतुक करत आसल्याची गुप्त माहीती वरुन पांगरा शिवारात गणेश शिंदे यांच्या शेतालगत मारोती मंदीराशेजारील मोकळ्या जागेत सहाय्यक पोलिस निरिक्षक सुनिल गोपिनवार, सविता बोधनकर, बालाजी जोगदंड संतोष पटवे आदीनी विशाल गुलाबराव शिंदे यांच्या महिंद्रा मॅक्स गाडीमध्ये देशी दारुचे १७ बॉक्स त्याची किंमत ४२ हजार ४३२ रुपयेकिंमतीचा माल व वाहतुक करणारी जिप असा एकूण तिन लाख ४२ हजार ४३२ रुपये किमतीचा मुद्देमाल छापा टाकुन जप्त केला. या प्रकरणी विशाल गुलाबराव शिंदे, सुशिल रावसाहेब शिंदे रा. पांगरा शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत.
हेही वाचा - नांदेडच्या श्रीनिकेतन हायस्कूलच्या शिक्षकांनी उगारले बंड, प्रशासनाच्या कारभाराविरोधात उपोषण
बासंबा ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणच्या धाडीत देशी दारु जप्त
हिंगोली : तालुक्यातील बासंबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी तीन ठिकाणी पथकाने धाडी टाकून अवैध देशी दारु विक्री करणाऱ्या दुकानावर धाडी टाकून आठ हजार ६६० रुपयाची दारु जप्त करण्यात आली.
सध्या ग्रामपंचायत निवडणुका असल्याने प्रचारही शिगेला पोहचला आहे. उमेदवाराकडून जंगी पार्ट्या, दारु पुरवली जात आहे. त्यामुळे अवैध देशी दारु विक्री करणाऱ्यांचे फावले आहे. अवेध्य दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना कळताच पोलिस उपनिरीक्षक मलपिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या सिरसम, पेडगाव, नांदुसा या तीन ठिकाणी छापा मारुन आठ हजार ६६० रुपयांचा अवैध दारुसाठा जप्त करण्यात आला असून तिघांवर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संपादन- प्रल्हाद कांबळे