Three Arrested for Robbing Traders Cash by Throwing Chilli Powder in Eyes
sakal
- रामेश्वर अमृते
गंगापूर - गंगापूर-वैजापूर महामार्गावर माहुली शिवारात व्यापाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पूड फेकून एक लाख ५५ हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. तिघांकडून चोरीच्या रकमेतील काही रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ४१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.