esakal | लामजना येथील तिघांचा अजमेरहून परतताना अपघातात मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतिकात्मक छायाचित्र

लामजना (ता. औसा,जि. लातूर) येथील लाडखॉं परिवार अजमेर (राजस्थान) येथे देव दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन गावाकडे परत येताना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका टोलनाक्‍याजवळ शुक्रवारी (ता. 23) सकाळी क्रुझर जीप चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकली. यात जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 

लामजना येथील तिघांचा अजमेरहून परतताना अपघातात मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किल्लारी(जि. लातूर)ः  लामजना (ता. औसा) येथील लाडखॉं परिवार अजमेर (राजस्थान) येथे देव दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन गावाकडे परत येताना मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील एका टोलनाक्‍याजवळ शुक्रवारी (ता. 23) सकाळी क्रुझर जीप चालकाचा ताबा सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून धडकली. यात जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. 


या अपघाताची माहिती लामजना ग्रामस्थांना कळताच गावातून हळहळ व्यक्त होत आहे. गावावर शोककळा पसरली आहे. लामजना येथील लाडखॉं कुटुंबीय त्यांच्या नातेवाइकांसह अजमेर (राजस्थान) देव दर्शनासाठी गेले होते.

देवदर्शन करून निघाल्यानंतर शुक्रवारी सकाळी मध्यप्रदेशातील नशिराबाद राष्ट्रीय महामार्गावरील रतलाम जिल्ह्यातील टोल नाक्‍यावर थांबलेल्या ट्रक (एचआर-65, ए-9370)वर भरधाव क्रुझर जीप (एमएच-25, आर-0854) पाठीमागून धडकली. या अपघातात सलीम अब्दुल लाडखॉं (वय 52), त्यांची सून आलिशा शरीफ लाडखॉं (वय 30), नातेवाईक रहीम सालार मुल्ला (वय 35) हे तिघे जागीच ठार झाले. तर, शरीफ सलीम लाडखॉं, जन्नतबी सलीम लाडखॉं, अल्फिया शरीफ लाडखॉं, हर्षद शरीफ लाडखॉं, राहील शरीफ लाडखॉं, आणि चालक नूर मोहम्मद शेख हे गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतदेह शनिवारी (ता. 24) सकाळी लामजना येथे आणण्यात आले. दुपारी येथील कब्रस्तानमध्ये दफनविधी करण्यात आला.  

loading image
go to top