गेवराई - अतिवृष्टी, अवकाळी अन् सततच्या नापिकीने सरकारी बँकेच्या कर्जाचा डोंगर वाढता होत चालल्याने बीडमधील गेवराईतील तीन शेतक-यांनी एकाच दिवशी (ता. ३) गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले आहे..कधी दुष्काळसदृश परिस्थिती, कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टी अन् गारपीट यामुळे ग्रामीण भागातील गावखेड्यातील शेती व्यवसाय वर्षानुवर्ष धोक्यात चालला आहे. कृषी प्रधान देश असलेल्या भारत देशात जवळपास ७० टक्क्याहून नागरिक हे शेती कसूनच आपल्या कुटुंबाची गुजराण करत आहेत. वर्षभर शेतात राब-राब करून मुलांची शिक्षण, मुलीचे लग्न तसे वर्षाचा घर खर्च हा शेतीतून करावा लागत आहे..मागच्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील गावखेड्यातील शेती निसर्गाच्या कचाट्यात सापडत चाललेली आहे. ऐन पिक पदरात पडणार तोच कधी अवकाळीने तर कधी अतिवृष्टीत पिके उध्वस्त होत आहेत. पिकाला केलेला खर्च देखील शेतमालावर वसूल होत नाही. परिणामी शेतकरी याच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. यामुळेच शेतकरी आत्महत्येच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे..मंगळवारी तीन तारखेला गेवराईतील चोवीस तासात तीन शेतक-यांनी कर्जपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळले.तांदळा गावातील धोंडीराम चंद्रभान ससाणे (वय-५५), विनायक जनार्धन जाधव (वय-३५) रा. रोकडा तांडा आणि समाधान कचरु वक्ते (वय-२२) रा. सिरसदेवी, गेवराई तालुक्यातील या तीन शेतक-यांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळल्याने या शेतक-यांची कुटुंब उघड्यावर पडली असून, सरकारने शेतक-याने पिकविलेल्या शेतमालास योग्य भाव देण्याची गरज आहे..शेती व्यवसाय परवडेना -वर्षानुवर्ष शेती निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडत असल्याने शेतक-यांची खरिप अन् रब्बीतील पिकाचे उत्पादन प्रारंभ होताच निसर्ग उध्वस्त करत आहे. यामुळे आता मोठा शेतकरी याने तर ठेक्याने शेती देण्यावर भर दिलेला आहे. अल्पभूधारक शेतक-यास शेती परवडेनासी झाल्याने या शेतक-याची कुटुंब रोजगारासाठी थेट शहरात स्थलांतरीत झाली आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.