
परळी वैजनाथ : मराठी नववर्षाची तयारी सर्वत्र सुरू झालेली आहे. घरोघरी गुढी उभारून हा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी साखरेच्या गाठीनाही तेवढेच महत्त्व असते. नाथ चित्रमंदिर पाठीमागे असणाऱ्या कल्याणकारी हनुमान मंदिराजवळ राहणारे मनोज गवते यांचे कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यांपासून साखरगाठी तयार करत आहेत. दरवर्षी साधारणपणे ५० क्विंटल साखरगाठी तयार करुन विक्री करतात.