तीन लाख बारा हजार चारशे सहा मतदार ठरविणार आमदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, तालुका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मतदारसंघातील तीन लाख बारा हजार चारशे सहा मतदार आपला आमदार निवडणार आहेत. यात एक लाख 65 हजार 158 महिला तर एक लाख 47 हजार 240 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदार जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढली असून, नव्याने सहा हजार मतदारांचा समवेश झाला आहे.

गंगापूर (औरंगाबाद ) : गंगापूर-खुलताबाद विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, तालुका प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मतदारसंघातील तीन लाख बारा हजार चारशे सहा मतदार आपला आमदार निवडणार आहेत. यात एक लाख 65 हजार 158 महिला तर एक लाख 47 हजार 240 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदार जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढली असून, नव्याने सहा हजार मतदारांचा समवेश झाला आहे. गंगापूर 220, तर खुलताबाद तालुक्‍यात 95 मतदान केंद्र आहेत. एकूण 315 ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली

आहे. जवळपास एक हजार 250 कर्मचारी निवडणुकीचे काम करणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी संदीप पाटील काम पाहत आहेत. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगोटे, खुलताबादचे तहसीलदार राहुल गायकवाड यांच्या नियंत्रणात निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे. ता. 21 ऑक्‍टोबरला प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. तालुक्‍यात मागील तीन महिन्यांपासूनच निवडणूक वातावरण तापायला सुरवात झाली असून, विधानसभेच्या इच्छुक उमेदवारांनी गाव पिंजून काढायला सुरवात केली आहे.

मुक्तानंद महाविद्यालयात मतमोजणी

मुक्तानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दरवर्षीप्रमाणे या वर्षीही पोलिस बंदोबस्तात मतमोजणी होणार आहे. मतदानानंतर मतदान यंत्र देखील पोलिसांच्या निगराणीत याच सभागृहात सुरक्षित ठेवले जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Lack 12 Thousand Four Hundred Six Will Decide MLA