Phulambri News : लाडसावंगीच्या पाणी योजनेला तीन महिन्यांचा अल्टिमेटम! आमदार सुहास शिरसाठ यांच्याकडून पाठपुरावा सुरू

लाडसावंगी परिसरात वाढती दुष्काळी परिस्थिती, भूजल पातळीत होणारी घट आणि संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे.
mla suhas shirsath

mla suhas shirsath

sakal

Updated on: 

फुलंब्री - फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील लाडसावंगी गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेची पाहणी करून काम ७० टक्के पूर्ण झाले असतानाही उर्वरित ३० टक्के काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे. एवढा मोठा खर्च होऊनही लाडसावंगीकरांना अद्याप पाणी मिळत नसल्याने आमदार सुहास शिरसाठ यांनी वेळोवेळी हा प्रश्न आक्रमकपणे उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांकडून येत्या तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचा शब्द घेतला.

Loading content, please wait...