Court
sakal
- राजेंद्र व्यास
गंगापूर - मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करून तो अपघात असल्याचा भासवणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा गंगापूरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल शिंदे यांनी सुनावले आहे.
याविषयीची माहिती अशी की, रूपचंद वाकचौरे यांची मुलगी वैष्णवी हिने शिवराम एकनाथ मोडे यांचा भाचा विशाल लक्ष्मण नवले याच्याशी प्रेम विवाह केला होता. तो विवाह मुलीचे वडील रूपचंद वाकचौरे यांना मान्य नव्हता. त्या विवाहास शिवराम मोडे यांचा मुलगा पवन मोडे यांनी मदत केल्याचा संशय रूपचंद यास होता.