

Accident
sakal
जिंतूर - शहरापासून सुमारे २० किमी. अंतरावर जिंतूर-औंढा महामार्गावरील रामेश्वर पाटीजवळ मंगळवारी (ता. १४) सकाळी १० च्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघेजण गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर एकास नांदेड, तर दोघांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.