Electric Short Circuit
sakal
देगलूर - तालुक्यातील खानापूर येथे शुक्रवारी (ता. १९) रात्री शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या आगीत लॉन्ड्री, फर्निचर आणि किराणा दुकानातील साहित्य पूर्णपणे भस्मसात झाले असून सुमारे सहा लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.