Accident : कार व ट्रॅक्टरचा भिषण अपघात, तीन शिक्षकांसह कारचालकाचा मत्यू

जेवण करून परत येत असताना कार उसाच्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या (एमएच २४ पी ७३९९) ट्रॉलीला पाठीमागून धडकली.
Teachers Death in Accident
Teachers Death in AccidentSakal

औसा - औसा- तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील शहराजवळ असणाऱ्या हॉटेल साईप्रसाद समोर एका भरधाव कारने उसाच्या रिकाम्या ट्रॉलीला पाठीमागून जबर धडक दिल्याने कारमधील चारही लोकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १२ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास घडली. या अपघातात तीन शिक्षक व एक कार चालकाचा समावेश आहे. हा अपघात एव्हढा भीषण होता की धडकेनंतर कारचे इंजिन तुटून तिस फुट लांब जाऊन पडले होते. तर कारमधील प्रवाशांच्या शरिराचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

या बाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवारी (ता.२२) रोजी खरोसा, ता. औसा येथील केंद्रीय शाळेतील मुख्याध्यापक संजय बाबुराव रणदिवे (वय-४१)रा. विळेगाव ता. देवणी, सहशिक्षक जयप्रकाश मोतीराम बिराजदार (वय-४५) रा. खरोसा हे आणि त्यांचे किल्लारी येथील शिक्षक मित्र महेबुब मुन्वरखान पठाण (वय-४५) हे तिघे आणि कारचालक नन्हू राजेसाब बागवान (वय-३४) कार क्रमांक एम.एच. ०६ बीई ९६४६ मधून शिवलीला जेवण करण्यासाठी गेले होते.

जेवण करून परत येत असताना औशा जवळील हॉटेल साईप्रसाद याच्या समोर ही कार आली असतांना उसाच्या रिकाम्या ट्रॅक्टरच्या (एमएच २४ पी ७३९९) ट्रॉलीला पाठीमागून धडकली. ही धडक एव्हडी जोरात होती की, कारचे इंजिन तुटून तिस फुट लांब पडले होते. तर कारमधील तीन शिक्षकासह काराचालकाचा चेंदामेंदा झाला होता. कारमध्ये शरिराचे अवयव तुटून पडले होते.

अंगाचा थरकाप उडविणाऱ्या या अपघातातील मृतदेह गाडीबाहेर काढण्यासाठी पोलिसांना क्रेनच्या मदतीने कारचे तुकडे करावे लागले. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर कारमध्ये अडकलेले मृतदेह पोलिसांनी बाहेर काढल्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा पुढील तपास औसा पोलीस हे करीत आहेत.

शिवलीचे मटण ठरले शेवटचे...

शिवलीच्या मटणाची चव चाखण्यासाठी पारजिल्यातून अनेक लोक येतात. येथे बोकडाचे मटण चविष्ट मिळत असल्याने तिन्ही शिक्षकांनी मटणाचा बेत आखला होता. पण नियतीने त्यांना या अपघातात कायमचे हिरावून घेतल्याने शिवलीचे हे जेवण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरले. किल्लारी, खरोसा आणि विळेगावात शोककळा पसरली होती. हे तिघेही शिक्षक उपक्रमशील शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्राची न भरून येणारी हानी झाल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com