esakal | घरगुती वीज जोडणीसाठी घेतली तीन हजारांची लाच
sakal

बोलून बातमी शोधा

घरगुती वीज जोडणीसाठी घेतली तीन हजारांची लाच

घरगुती विज जोडणीसाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता चतुर्भुज झाल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी चिंचवन (ता. वडवणी) येथे घडली. सोमनाथ ज्ञानोबा घुले असे लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.​

घरगुती वीज जोडणीसाठी घेतली तीन हजारांची लाच

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बीड : घरगुती विज जोडणीसाठी तीन हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता चतुर्भुज झाल्याची घटना मंगळवारी (ता. तीन) दुपारी चिंचवन (ता. वडवणी) येथे घडली. सोमनाथ ज्ञानोबा घुले असे लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी : चिंचवण (ता. वडवणी) येथे एकाला घरगुती वीज जोडणी घ्यायची होती. त्यासाठी संबंधीताने महावितरणच्या चिंचवण येथील शाखा कार्यालयात अर्ज व कोटेशन दाखल केले. सहाय्यक अभियंता सोमनाथ घुले याने तीन हजार रुपयांची लाच मागीतली. (ता. 26) ऑगस्ट रोजी घुले याने संबंधीत तक्रारदाराला लाच मागीतल्यानंतर त्याने येथील लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

मंगळवारी लाच देण्याचे ठरले. त्यानुसार लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना सोमनाथ घुले यास रंगेहाथ पकडण्यात आले. लाच - लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक बाळकृष्ण हनपूडे पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

loading image
go to top