Waluj Crime : वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांना मारहाण, पंढरपूर येथील ओयासीस चौकातील घटना

'हा रोड तुमचा नसुन सार्वजनिक आहे'. मी कुठेही गाडी भरीन.
Beating to traffic police
Beating to traffic policesakal
Updated on

वाळूज महानगर - रहदारीस अडथळा निर्माण होईल, अशा अवस्थेत कार उभी करून प्रवासी भरणाऱ्याने वाळुज वाहतूक शाखेच्या सहायक फौजदार, पोलीस अंमलदार व पोलीस हवालदार अशा तिघांना शिवीगाळ करत हाताचापटाने व लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार पंढरपूर येथील ओयासीस चौकात मंगळवारी (ता. 25) रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळुज वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार सुधीर बाळकृष्ण गाडगे (वय-35),पोउपनि गायकवाड, पोअं साळवे असे मंगळवारी (ता. 25) रोजी पंढरपूर येथील ओयासीस चौकात सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वाहतुक नियमन करीत असतांना पांढऱ्या रंगाची इर्टिका कार ( एम एच 43, एक्स एक्स -4093) ही अहिल्यानगरकडे जाणाऱ्या लेफ्ट फ्रिमध्ये शिवम् पान सेंटरच्या समोर रस्त्यात रहदारीला अडथळा निर्माण करून थांबून होती.

त्यामुळे कार चालकास कार तेथून काढण्यास सांगीतले असता तेथे प्रवासी बसवण्यास मदत करणाऱ्या एका इसमाने 'हा रोड तुमचा नसुन सार्वजनिक आहे'. मी कुठेही गाडी भरीन असे म्हणाला. त्यामुळे सुधीर गाडगे हे त्या गाडीवर कार्यवाही करण्याकरीता ई-चलण मशीनव्दारे फोटो काढत असतांना तो नंबर प्लेट समोर येवुन हुज्जत घालून गाडगे यांच्या शर्टची कॉलर पकडुन ओढले.

यावेळी झालेल्या मारहाणीमुळे पोलीस अंमलदाराच्या शर्टाचे बटन व नेमप्लेट तुटली. त्याच वेळी वाळुज वाहतुक शाखेचे सफौ. शिंदे व पोह. थोरात यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तुम्ही माझ्या गाडीवर फाईन कसे मारता असे म्हणुन त्याच्या कार मधील लाकडी दांडा काढून पोह थोरात व स.फौ. शिंदे नाही मारहाण केली.

तसेच अश्लील शिवीगाळ करत तुम बहुत मस्ती आ गये, तुम्हे देख लूंगा. अशी धमकी दिली. वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण होत असल्याचे समजताच वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोउपनि. दिनेश बन, पो.ह. बाबासाहेब काकडे, पो.अं. भगवान मगर, पो.अं. रविंद्र गायकवाड यांनी धाव घेत मारहाण करणाऱ्या एजाज सय्यद मोहम्मद अली, (वय-44), रा. सलामपुरेनगर पंढरपुर याला ताब्यात घेतले.

याप्रकरणी सुधीर गाडगे यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी एजाज सय्यद मोहम्मद अली व कार चालक रोहीत मधूकर दळवी (वय-21), रा. त्रिमुर्ती चौक वडगांव (को.) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com