बीड जिल्ह्यात आणखी तीन दुचाकींची चोरी, गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून अंबाजोगाईतून दोन तर परळी तालुक्यातून एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना रविवारी उघडकीस आली.

बीड : जिल्ह्यात दुचाकी चोरीचे सत्र सुरुच असून अंबाजोगाईतून दोन तर परळी तालुक्यातून एक दुचाकी चोरीस गेल्याची घटना रविवारी उघडकीस आली.
अंबाजोगाईतील प्रशांत नगरात लक्ष्मण अंबादास गोरे हे राहतात. घरासमोरील पार्किंगमधून त्यांच्या दोन दुचाकी चोरट्यांनी लंपास केल्या.

पाच हजार किमतीची दुचाकी (क्र. एम. एच. ४४ व्ही. ६२१५) व ३५ हजार रुपयांची दुचाकी (क्र. एम.एच. २० सी.एल. ९२६८) चोरट्यांनी ५ डिसेंबर रोजी लंपास केली. या प्रकरणी गोरे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत शनिवारी गुन्हा नोंद झाला. परळी तालुक्यातील गाढेपिंपळगाव येथून यशवंत पांडुरंग सोनवणे यांची ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एमएच ४४ एन-३२५५) चोरट्यांनी लंपास केली. यावरुन सिरसाळा ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

 

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Two Wheelers Theft In Beed District

Tags
टॉपिकस
Topic Tags: