esakal | लोकांची फसवणुक करणारे तीन भामटे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व पूर्णा पोलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पूर्णा पोलिस ठाण्यात ता. पाच मार्च रोजी कार चोरीची तक्रार सचिन रमेश टिळेकर यांनी दाखल केली होती. 

लोकांची फसवणुक करणारे तीन भामटे गजाआड; स्थानिक गुन्हे शाखा व पूर्णा पोलिसांची कामगिरी

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः लोकांची फसवणुक करून त्यांच्या चारचाकी व दुचाकी गाड्या घेवून पळूण जाणाऱ्या तीन भामट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता.12) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन महागड्या चार चाकी गाड्यासह एक बुलेट ही जप्त करण्यात आली आहे.

पूर्णा पोलिस ठाण्यात ता. पाच मार्च रोजी कार चोरीची तक्रार सचिन रमेश टिळेकर यांनी दाखल केली होती.  त्यांची कार माऊली महाराज नामक व्यक्तीने पळून नेली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व पूर्णा पोलिस यांचे संयुक्त पथक तयार केले होते. या गुन्ह्यातील आरोपी माऊली महाराज हा त्याची ओळख लपवून राहत होता. त्याने त्याचे नाव व फोटो चुकीचा सांगितेला असल्याने पोलिसांना शोध कार्यात अडचणी निर्माण होत होत्या.

पंरतू सायबर शाखेच्या मदतीने पोलिसांचे पथक आरोपी पर्यंत पोहचले. माऊली महाराज हा वसमत (जि. हिंगोली) येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचवेळी चोरी गेलेली इनोव्हा कार चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकास मिळाली. ही कार चुडावा पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आली. चालक प्रकाश गंगाराम ताटे यास ताब्यात घेण्यात आले. याची माहिती माऊली महाराज यांना कळाल्यानंतर तो सेलू मार्ग पळून जाण्याच्या तयारीत होता. परंतू सेलू पोलिसांच्या पथकाने माऊली महाराज यास ताब्यात घेण्यात आले.

माऊली महाराज नाव ही बनावट

माऊली महाराज यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याचे खरे नाव बबन सखाराम थोरात (वय 54, रा. कुसगाव, लोणावळा जि. पुणे) असल्याचे समोर आले. बबन थोरात याने स्वताचे वेगवेगळे ओळख पत्र तयार करून स्वताची ओळख लपवित लोकांना गंडा घालण्याचे काम केले. त्याचे चार गुन्हे पोलिसांनी  उघड केले आहेत. हे चारही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. बबन थोरात याच्यासह तीघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image