Tiger In Latur : पावलांचे ठसे आढळले, वन विभागाचा दुजोरा; धाराशिवचा वाघ लातूर जिल्ह्यात
Latur News : धाराशिवमधील वाघ आता लातूर जिल्ह्यात पोहोचल्याची वनविभागाने माहिती दिली आहे. मुरूड परिसरात पावलांचे ठसे सापडल्यामुळे वाघाच्या हालचालीची पुष्टी झाली आहे.
धाराशिव : मागील काही दिवस तुळजापूर तालुक्यात संचार करणारा वाघ आता धाराशिव जिल्ह्याची हद्द ओलांडून लातूर जिल्ह्यातील मुरूड परिसरात गेलेला आहे. त्याचा सध्याचा नेमका ठावठिकाणा सांगता येणार नाही, अशी माहिती विभागीय वन विभागाकडून देण्यात आली.