esakal | बिबट्याच्या तावडीतून बचावले दाम्पत्य !
sakal

बोलून बातमी शोधा

file photo


०- प्रसंगावधानामुळे चिमुकल्यासह गाडे दाम्पत्याचे प्राण वाचले
०- जनजिवन विस्कळित झाले तरी, वनविभाग बघ्याच्या भूमिकेत !

बिबट्याच्या तावडीतून बचावले दाम्पत्य !

sakal_logo
By
गंगाधर डांगे


मुदखेड, (जि. नांदेड) ः नांदेडहून चिलपिंपरी (ता. मुदखेड) येथे मुक्कामास जाणाऱ्या प्रा. गाढे यांच्या दुचाकीसमोर अचानक आलेल्या बिबट्याला पाहून गर्भगळीत झालेल्या प्राध्यापकाने आपली दुचाकी प्रसंगावधान राखुन माघारी वळविली, या वेळी आपल्या चिमुकल्यासह पत्नी व स्वतःचा जिव वाचविल्याची घटना नुकतीच या शिवारात घडली आहे. या मुळे परिसरातील नागरीक, शेतकरी यांच्यामध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

हल्ली गंगापट्टयात बिबट्या हा मोकाट सुटला असल्याने भागात जंगली जनावरांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. आजच्या घडीला सहा महिन्यांपासून बिबट्याचे लहान लहान जनावरांच्या शिकारीचे सत्र चालूच आहे. त्याने या पुर्वी पाळिव गाय म्हशीची वासरं, कुत्रे, माकड अशी अनेक जनावरांची शिकार केली आहे. गेल्या आठवड्यात एका व्यक्तीला पंजा मारुन घायाळ केल्याची घटना देखिल घडली.

हेही वाचा ः  चोरट्यांची नविन वर्षात पोलिसांना सलामी

बिबट्याचे घाटनाचक्र नेहमीचेच
परवा बिबट्या रात्री आठच्या सुमारास दरेगाव शिवारात गस्त घालत असताना नांदेडहुन चिलपिंपरीकडे आजारी असलेल्या आईस भेटन्यास प्रा. सुधाकर रावसाहेब गाडे व त्यांच्या पत्नी वंदना सुधाकर गाडे या दुचाकीवर चिलपिंपरीकडे मुक्कामी प्रवासात या जोडप्यांच्या दुचाकी गाडीसमोर येऊन ऊभा राहिला. दुचाकिस्वाराने शिताफिने स्वतःला सावरुन पत्नी व मुलाचा बचाव करुन घेतला. असे बिबट्याचे घाटनाचक्र गेली सहा महिन्यापासून नेहमीचेच झाले आहे. या संदर्भात संबंधित प्रशासनाला माहिती देऊनही प्रशासन आज तरी निव्वळ बघ्याच्या भुमिकेत आहे असेच दिसते.

वन विभागाचे झापेचे सोंग 
काही वर्षापुर्वी या भागात वनविभागाने बिबट्याचे किंवा वाघाचे जोडपे आनून सोडल्याच्या चर्चा अनेकवेळा झाल्या. पण त्या साक्षात आज खऱ्या ठरतांना पहायला मिळाल्या. गेल्या सहा महिन्यांपासून भागात दोन बिबटे दिवस रात्र गस्त घालतात हे आता स्पष्ठ झाले आहे. दोन महिन्यापूर्वी माळकौठा येथिल आनंदा बालाजी कराळे यांचे पाळिव कुत्रे व पाळिव माकडाची शिकार केली. बापूराव सिरगिरे यांच्या म्हशिचे वगार तर बालाजी शिंदे यांच्या देखिल म्हशिचे वगार भक्ष केले. तेथून महाटी, दरेगाव, चिलपिंपरी, टाकळी या शिवारात अशा अनेक शिकार केल्या. आता झालेल्या व होणाऱ्या नुकसानिसाठी जबाबदार कोन? असा प्रश्न विचारला जात आहे. वारंवार या परिसरातील सात्तत्याने बातम्या प्रसिद्ध झाल्या तरी झोपेच सोंग घेतलेल्या वन विभागाकडे जनतेत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

loading image