Tiger : वाघ येडशीतून उक्कडगावकडे; तीन जनावरांचा पाडला फडशा, रेस्क्यू टीमला पुन्हा चकवा

Wildlife Rescue : येडशीतील वाघ ने रेस्क्यू टीमला चकवा देऊन उक्कडगाव हद्दीत तीन जनावरांचा जीव घेतला. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असले तरी वाघाला पकडण्यात रेस्क्यू टीम यशस्वी होऊ शकले नाही.
Tiger
Tigersakal
Updated on

धाराशिव : येडशीच्या दक्षिण भागातून वाघ रेस्क्यू टीमला चकवा देऊन उत्तर भागात गेला आहे. बार्शी तालुक्यातील उक्कडगाव हद्दीत त्याने शुक्रवारी सायंकाळी तीन जनावरांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात तिन्ही जनावरे दगावली. ही माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान, चौथ्या दिवशीही रेस्क्यू टीमला वाघाला पकडण्यात यश आले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com