Santosh Deshmukh Case : आरोपींभोवती पुराव्यांचा फास अधिक घट्ट
Beed Crime : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींविरोधातील पुरावे अधिक मजबूत होत असून १०० हून अधिक साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपासाला वेग आला आहे. गोपनीय साक्षीदारांचे जबाब आरोपींना अडचणीत आणत आहेत.
बीड : संतोष देशमुख यांचे अपहरण, हत्येसह खंडणी व ॲट्रॉसिटी या तीन गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात १०० हून अधिक साक्षीदारांचे जबाब आहेत.