बजाजनगर - वाळूज एमआयडीसी लगतच्या गंगापूर टोकी शेतवस्तीवर शेजवळ कुटुंबाच्या घरी बुधवारी (ता. ३०) रात्री दरोडेखोरांनी दरोडा टाकून कुटुंबातील व्यक्तींना जबर मारहाण केली होती. यात तब्बल ५ लाख ४७ लाखांच्या दागिन्यांसह रोख लंपास केली होती. या दरोड्याच्या तपासात श्वान टिपूने पोलिसांना मोठी मदत केली. त्याच्या साहाय्याने पोलिसांनी संशयित दरोडेखोर शक्तिमानसह सात जणांना अटक केली.