तीर्थपुरीत नाफेडची 35 क्विंटल तूर चोरीला, शटर तोडले. 

तुकाराम शिंदे 
Tuesday, 27 October 2020

तीर्थपुरी येथील खरेदी केलेली 35 क्विंटल तूर अंदाजे किंमत एक लाख रुपयाची गोदामाचे शटर तोडून चोरीस गेल्याची घटना मंगळवारी (ता.27) रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. 

तीर्थपुरी (जालना) : तीर्थपुरी येथील खरेदी केलेली 35 क्विंटल तूर अंदाजे किंमत एक लाख रुपयाची गोदामाचे शटर तोडून चोरीस गेल्याची घटना मंगळवारी (ता.27) रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीर्थपुरी येथे नाफेडने खरेदी केली. ही खरेदी येथील वखार महामंडळाच्या गोदामात साठवण्यात आली होती. मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास अंदाजे 30 ते 40 पोते तूर चोरी गेल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे या ठिकाणी वाचमन असताना ही तूर चोरी गेलेली असल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वखार महामंडळाचे भांडारपाल पी. एस. पुरी यांना विचारले असता त्यांनी अध्यापही किती तूर गेली आहे याबाबत सांगीतले नाही. या तुरीचे मोजमाप सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे नेमकी किती तूर चोरी गेली हे स्पष्ट झालेले नाही. येथील गोदामात मोठ्या प्रमाणात धान्यसाठा साठवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गजानन कौळासे, जमादार श्रीधर खेडकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या घटनेची अद्यापही पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली नाही. असेही पोलिसांनी सांगीतले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tirthpuri shutters broken Nafeds 35 quintals tur stolen