Child Saved sakal
मराठवाडा
Child Saved : विहिरीत पडलेल्या बालकास दिले जीवदान
Well Rescue : उमरग्यातील चिंचोली येथे खेळता-खेळता चिमुकला विहिरीत पडला. मात्र, दोन तरुणांनी धाडस दाखवत त्याला सुखरूप बाहेर काढले.
उमरगा : खेळता-खेळता चिमुकला विहिरीत पडला. परिसरातील दोघांनी धाव घेत विहिरीत उडी घेत चिमुकल्याला सुखरूप बाहेर काढले. चिंचोली (भुयार, ता. उमरगा) येथे गुरुवारी (ता. २७) सकाळी आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

