
कळंब : तालुक्यात गुरुवार (ता. 14) रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर अक्षरशः पाणी फेरले आहे. मांजराकाठ च्या व वाशिरा नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.