Kalamb News : अतिवृष्टीने जमीन गिळंकृत; शेतकरी उद्ध्वस्त, प्रशासन मात्र झोपेत!

2025 मधील अतिवृष्टीच्या पावसाने कळंब तालुक्यातील नदीकाठच्या शेतजमिनींचे अक्षरशः अस्तित्व धोक्यात आले आहे.
Torrential Rains Swallow Farmland in kalamb

Torrential Rains Swallow Farmland in kalamb

sakal

Updated on

कळंब - 2025 मधील अतिवृष्टीच्या पावसाने कळंब तालुक्यातील नदीकाठच्या शेतजमिनींचे अक्षरशः अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी नदीकाठापासून शंभर मीटरपर्यंत जमीन वाहून गेली असून, शेतांमध्ये मोठमोठी भगदाडे पडली आहेत. लाखो रुपयांची सुपीक जमीन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने पाठ फिरविली असून जमिनी दुरुस्त करण्याच्या कामाला दमडीच्याही निधीची अद्यापर्यंत आर्थिक तरतूद गेली नसल्याने शेतकरी संकटात सापडलेले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com