
परभणी जिल्ह्यात मंगळवारी उपचारारम्यान पाच जणांचा मृत्यू झाला तर ८५ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयातील एक महिला, दोन पुरुष तर खासगी रुग्णालयातील एक महिला एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या चार हजार ७८८ झाली आहे तर एकूण मृत्युची संख्या २०१ झाली आहे.
परभणीः जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) उपचारारम्यान पाच जणांचा मृत्यू झाला तर ८५ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये शासकीय रुग्णालयातील एक महिला, दोन पुरुष तर खासगी रुग्णालयातील एक महिला एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित संख्या चार हजार ७८८ झाली आहे तर एकूण मृत्युची संख्या २०१ झाली आहे. तसेच मंगळवारी ७६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना हवी आर्थिक मदत
परभणी शहरात दोन पॉझिटिह
परभणी ः शहर महापालिकेच्या वतीने मंगळवारी (ता.२२) शहरातील पाच केंद्र, सात खासगी रुग्णालयात ९० व्यक्तींची रॅपीड अॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ८८ निगेटिव्ह व दोन व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्या. जागृती मंगल कार्यालयात १३ जणांची तपासणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील ४१ व्यक्तींची तपासणी केली असता एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडला. सिटी क्लब येथे सात, आयएमए हॉल येथे सात जणांची तपासणी करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात १२ ऑटोरिक्षाचालकांची तपासणी केली. सात खासगी दवाखान्यात दहा व्यक्तींची तपासणी केली. कोरोनाची लक्षणे आढळून येत असल्यास व्यापारी, भाजीविक्रेते, नागरिकांनी प्रभागात येणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.
हेही वाचा - परभणी जिल्ह्यात परसबागेतून पिकवला जातोय विषमुक्त भाजीपाला
पूर्णा येथे तीन कोरोना बाधित
पूर्णा ः ग्रामीण रुग्णालयांतर्गत १९ संशयितांची रॅपिड अॅन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणी करण्यात आली. त्यापैकी तीन कोरोना बाधित आढळले. येथील अलंकार नगरमधील ३६ वर्षीय पुरुष व २८ वर्षीय महिला, नवा मोंढा नांदेड येथील ४२ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळले. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ग्रामीण भागात सात संशयितांची रॅपिड ॲंटीजेन तपासणी करण्यात आली. त्यात कुणीही बाधित आढळले नाही.
मंगळवारी रात्री सात वाजेपर्यंतची आकडेवारी
परभणी जिल्हा
एकूण बाधित - चार हजार ७८८
आजचे बाधित - ८५
आजचे मृत्यु - पाच
एकूण बरे - तीन हजार ८७०
उपचार सुरु असलेले - ७१७
एकूण मृत्यु - २०१
संपादन ः राजन मंगरुळकर