Traditional Farming: ट्रॅक्टरच्या युगातही बैलजोडीचा ध्यास; २२ वर्षांच्या ‘राजा’नंतर खंडेराव बकाल यांनी पुन्हा जपला शेतीचा पारंपरिक वारसा

Khanderao Bakal Keeps Bullock Farming Tradition Alive: यंत्रयुगाच्या गडगडाटातही बैलजोडीचा मान राखत, राज्यपाल पुरस्कारप्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी परंपरा, मातीशी निष्ठा आणि बैलप्रेमाचा वारसा नव्या जोडीद्वारे पुन्हा उजाळला.
Khanderao Bakal Chooses Bullock Pair Over Tractors And Continues A 22 Year Farming Tradition After Raja Dies In Nanded Village

Khanderao Bakal Chooses Bullock Pair Over Tractors And Continues A 22 Year Farming Tradition After Raja Dies In Nanded Village

esakal

Updated on: 

-श्याम जाधव

नवीन नांदेड:"तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले, तरी शेतीचा आत्मा पारंपरिक कष्टातच दडला आहे. निसर्गाची अवकृपा आणि शेतीत वाढलेला यंत्रांचा गडगडाट... अशा अस्मानी व सुलतानी संकटांतही ज्यांनी 'बैलजोडी'ची साथ सोडली नाही, त्यांच्याच रक्तात खरी शेती, मातीचे ईमान आणि संस्कृतीची पाळेमुळे घट्ट रुजलेली असतात..." या उक्तीची प्रचीती असरजन येथील राज्यपाल पुरस्कारप्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी आपल्या कृतीतून आणून दिली आहे. एकीकडे शेतकरी यांत्रिक शेतीचा सोपा मार्ग निवडत असताना खंडेराव बकाल यांनी मात्र विपरीत परिस्थितीतही तंत्रज्ञानाला परंपरेची जोड देत कृषी संस्कृतीचा मूळ आत्मा कसा टिकवून ठेवावा, याचा एक प्रेरणादायी वस्तुपाठ संपूर्ण परिसरासमोर घालून दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com