

Five Arrested in Tractor and JCB Rental Fraud Case
Sakal
कळंब : ट्रॅक्टर व जेसीबी भाड्याने घेण्यासाठी दरमहा मोठी रक्कम देतो म्हणून 20 ते 25 शेतकऱ्यांना एक कोटी 22 लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. संतोष अजय चव्हाण रा. सरताळे ता. सातारा व रफिक अब्दुल शेख रा. दसमेगाव ता. वाशी या दोघांनी मिळून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कळंब पोलिसात गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणातील मुख्य संशयितसह चार जाणाला कळंब पोलिसांनी अटक करून त्यांच्या ताब्यातील 45 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 27 डिसेंबर रोजी केली आहे.