
बीड : पाटोदा शहरात व्याजखोरांच्या त्रासाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे. संजय संपतलाल कांकरिया (वय ६३, रा. रस्ता गल्ली, पाटोदा) असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, त्यांनी मंगळवारी (ता. २७) रोजी दुपारी शेतातील कांदाचाळीत लोखंडी अँगलला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.