
लातूर : दर्शवेळा अमावास्या साजरी करण्यासाठी घराघरात बनवले जाणारे पदार्थ आता बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. यंदापासून तर बाजारात धपाटे, शेंगदाण्याच्या पोळ्या, गव्हाची खीर, आंबिल हे खाद्यपदार्थही मिळत आहेत. त्यामुळे बऱ्याच नोकरदार लातूरकरांचा ओढा तयार पदार्थ विकत घेण्याकडे वाढला असल्याचे दिसून येत आहे.