Hingoli News: हिंगोलीतील जवाहर रोडवरील अतिक्रमण आणि पार्किंगचा अभाव यामुळे वाहतुकीचा खोळंबा वाढत असून, वाहनचालकांपुढे डोकेदुखी उभी राहिली आहे. महात्मा गांधी चौकापर्यंतचा रस्ता दुकाने, शाळा, पेट्रोल पंप आणि हातगाड्यांच्या अतिक्रमणाने भरून गेला आहे.
हिंगोली : हिंगोली शहरातील जवाहर रोड भागात वाहतूक कोंडीची समस्या वाहनधारकांना भेडसावत आहे. या रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाने रस्ता अरुंद होऊन त्याचा वाहतुकीवर परिणाम होत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.