परभणीत सणासुदीच्या दिवसात वाहतुकीची कोंडी 

PRB20A04018
PRB20A04018

परभणी ः कोरोनाच्या काळात दिवाळी आली आहे. यामुळे गर्दी कमी असू द्या असे प्रशासन ओरडून सांगत असलले तरी परभणीकरांनी बेजबाबदारपणा दाखवित बाजारात खरेदीसाठी गर्दी केली आहे. सण म्हटल्यानंतर खरेदी असणारच. परंतू, यालाही लावलेल्या नियमांना सर्रास धाब्यावर बसवून बाजारात गर्दी होतांना दिसत आहे. त्याचबरोबर वाहतुकीची व्यवस्था पुर्णत: कोलमडलेली असतांनाही वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या सुस्तीमुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. 

परभणी शहरातील मुख्य बाजार हा चार भागातच विभागेलला आहे. त्यात हे चारही परिसर एकमेकांना लागून असल्याने एकाच परिसरात लोकांची वारंवार गर्दी होत असते. त्यात शिवाजी चौक, गुजरीबाजार, गांधीपार्क व जनता मार्केट या चार भागात कपडे, किराणा व इतर साहित्यांची दुकाने आहेत. त्यामुळे सहाजिक शहरातील कोणत्याही कोपऱ्यात राहणारा नागरिक हा या चार भागात खरेदीसाठी येत असतो. त्यामुळे या भागात सणवाराला मोठी गर्दी उसळत असते.

जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात
बाहेर वस्त्यामधुन येणाऱ्या नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठी कुठेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. त्यात चारचाकी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने या चारही भागातील वाहतुकीची कोंडी वाढत जात आहे. या प्रकाराकडे वाहतूक व्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांचे मात्र साफ दुर्लक्ष होत आहे. नियम नाही, कारवाई नाही यामुळे नागरिकांची हिंमत वाढत जात असल्याचे दिसत आहे. 

कायमस्वरुपी पार्किंग हटविण्याची मागणी 
शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार या दोन ठिकाणी कायम स्वरुपी चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यामुळे बाहेर वस्त्यामधून खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरीकांना त्यांची वाहने कुठे पार्क करावीत हे समजत नाही. परिणामी जागा मिळेत त्या ठिकाणी ही वाहने पार्क केली जातात. त्यामुळे कायमस्वरुपी उभी करून ठेवलेली वाहने सणासुदीच्या काळात काढण्याची मागणी होत आहे. 

जनता मार्केटमधील रस्ता व्यापाऱ्यांनी व्यापला 
जनता मार्केटमध्ये बहुतांश कपड्याची दुकाने आहेत. कपडे खरेदी करण्यासाठी सर्वसामान्य लोक याच मार्केटमध्ये येत असतात. परंतू या मार्केटमधील रस्त्यावर व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केल्याने हे रस्ते अरुंद बनले आहेत. या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनाही थोडे मागे सरकविल्यास रस्ता रुंद होऊन गर्दी कमी होण्यास मदत होऊ शकते. 

वाहतूक पोलिसांनी सुस्ती झटकण्याची गरज 
शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी किंवा त्याला शिस्त लावण्याचे काम वाहतूक शाखेकडे असते. परंतू, अनेक ठिकाणी वाहतूक पोलिस हे केवळ विरुध्द दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांच्याच शोधात दिसतात. अस्थाव्यस्त पार्किग करणाऱ्यांवर या पोलिसांकडून कसलीही कारवाई होतांना दिसत नाही. पोलिसांनी ही सुस्ती झटकावी अशी मागणी ही होत आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com